अलिबाग / ओमकार नागावकर :- एमओसी आणि रेवदंडा डॉंक्टर्स असोसिएशन व ज्येष्ठ नागरीक संस्था, रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी डॉं. वरसोलकर हॉस्पिटल रेवदंडा बाजारपेठ येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ नागरीक संस्था रेवदंडा यांच्यावतीने अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करण्यात येतात, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे सत्कार करण्यात आले असून ९ मार्च रोजी डॉ.वरसोलकर हॉस्पिटल इथे कर्करोग निदान शिबीर (पॅप स्मिअर टेस्ट आणि पीएसए टेस्ट) डॉं. देवेंद्र पाल एमडी, डीएनबी, इसीएमओ कर्करोगतज्ज्ञ यांच्या वैद्यकिय सल्ल्याने शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमासाठी शेखर गावडे, श्रावणी खानविलकर, ज्योती चिपळूणकर, स्वप्नील बागुल, एमओसी कॅंन्सर केअर आणि रिसर्च सेंटरचे सहकारी उपस्थित होते. रेवदंडा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉं. महाजन, डॉं. वरसोलकर, डॉं. किरण जैन, डॉं. रुमाना मुंशी, डॉं. भाग्यश्री तळकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष सुभाष चिटणीस, वरसोलकर मॅडम, लता चिटणीस, प्रकाश पाटील, सुरेश खडपे, भगवान तांबडकर, रविकांत राऊत, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मनोहर नंदन यांनी विशेष प्रयत्न केले.
