आसरा एंटरप्रयाझेस या बांधकाम व्यावसायिकाची कोंडी ?

* न्याय व्यवस्थेकडून विलंब ; अफवा, दमदाटी, जातीवाद, मारहाण सहन करून विकासकाचा छळ

पनवेल-नवी मुंबई / साबीर शेख :- पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द गावातील गट क्र. २१/१ ही जागा येथील रहिवाशी बळीराम भोईर यांनी विकसित करण्यासाठी प्रथम विकासकाकडून द्वितीय विकासक आसरा एंटरप्रयाझेसतर्फे अयाझ मर्चंट यांना करार करून दिली होती. त्यानुसार इमारतीचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाल्यानंतर असमाधानी बळीराम भोईर अधिक लाभासाठी प्रयत्नशील असताना काही वेळा कराराव्यतिरिक्त मागणी करून वादविवाद करू लागले. साथीदाराच्या सोबतीने धार्मिक द्वेष करीत भांडण, वाद,  मारहाण केल्याने भोईर व अन्य सहकाऱ्यांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ४२०, ४०६, ३८६, ३८७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. त्यावर मात्र राजकीय, स्थानिक हस्तक्षेपामुळे मात्र अद्यापही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कसलीही कठोर कारवाई झाली नाही. 

मूळ जागा मालकाच्या दडपशाहीपणामुळे विकासकाचा लावलेला पैसा, वेळ वाया गेला, पुढे कोविड काळ आला, या सर्व संकटातून सावरता ग्राहकांना वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने काही ग्राहकांची कायदेशीर नोटीस द्वितीय विकासक मर्चंट म्हणून आली. विकासक, भागीदार, निवेशक म्हणून खटला वाद विवादित प्रकरण करणे स्वतःच्या गंभीर दुखपतीत सोडवावी लागली. त्यात संवेदनशील मुद्दा म्हणजे धार्मिक...मुस्लिम विकासक असल्याचा अविश्वास ग्राहकांना सांगितल्याने अनेक ग्राहक संभ्रमात असल्याने त्याने सातत्याने अयाझ मर्चंट यांच्याकडे ताबा किंवा पैसे मिळावे यासाठी तगादा लावला. या जागा बाबतीत बळीराम भोईर यांनी कधीही रद्द न होणारे कुळमुखत्यारपत्र हे आसरा एंटरप्रयाझेसच्या नावाने दिले असून सुद्धा फक्त स्वतःला जास्तीचा लाभ मिळण्याच्या अपेक्षेत शेतकरी भोईर यांनी अनेक प्रयत्न केले. आत्महत्या केलेल्या पहिल्या विकासकासारखे द्वितीय विकासक म्हणून ते मला ही हुसकाविण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने षड्यंत्र रचून सदर प्रकरण विवादित करीत असल्याची माहिती मर्चंट परिवाराने दिली. 

९ मार्च २०२५ रोजी ग्राहकांनी बुक केलेल्या बिल्डिंगच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी मूळ शेतकरी हा विकासक फसवणूक करणारा आहे. तो इमारतीचे काम पूर्ण करू देणार नाही माझ्यासोबत तुम्ही या असे एक न अनेक प्रकार उपस्थित ग्राहकांनी पत्रकारांना सांगितले. या ठिकाणी इमारतीच्या विकासकाच्या प्रमुख कार्यालयाला लॉक केल्याने आम्ही कोणाकडे माहिती घ्यायची असा प्रश्न ही ग्राहकांनी उपस्थित केला. सर्वसामान्य ग्राहकांची अनेक वर्षाची  रक्कम गुंतल्याने आम्ही सगळे बेघर झालो आहे, असे उपस्थित महिलांना सांगितले. आज आम्ही विकासक आसरा एंटरप्रयाझ यांच्याशी यावर मार्ग काढावा यासाठी जमलो असताना विकासक अयाझ मर्चंट यांनी मी आज ही बिल्डिंगचे सर्व काम पूर्ण करून देण्यासाठी तयार आहे व मूळ जागा मालकासोबत सामंजस्यांने तडजोड करण्यासाठी ही तयार आहे, असे निःसंकोचपणे विश्वास देत सांगितले. पण सदर प्रकरणात मला  न्यायव्यवस्थेकडून सहकार्य मिळण्यास विलंब होत असल्याने मला व माझ्या स्टाफला त्वरीत न्याय व सुरक्षा मिळत नाही, याउलट मला जिवे मरण्याचा अनेक वेळा प्रयत्न होत असून माझी स्वतः पहिल्या विकासकाप्रमाणे आत्महत्या करण्याची इच्छा निर्माण होत असल्याने माझा स्वतःचा परिवार ही मला पाहून चिंतेत आहे, असे अयाझ मर्चंट यांनी भावुक मनाने प्रसार माध्यमांना सांगितले. 

या प्रकरणात मला त्वरीत न्याय पालिका, पोलिस प्रशासन, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी व पत्रकार यांनी मला लोकांना घरे बनवून देण्यासाठी माझ्या प्रकरणात मला सहकार्य करावे, मी कर्जबाजारी झालो असलो तरी मला कोणाचाही एक फुकटचा गैर पैसा नको... पनवेलकरांनी मला व माझ्या परिवाराला खूप काही दिले आहे. पण आता या क्षणी मात्र मी नैराश्याने आत्महत्या करतो की काय असे सतत मला जाणवते म्हणून मायबाप न्यायव्यवस्थेने मला व माझ्या परिवाराला न्याय द्यावा, अन्यथा मला सदर विकासक म्हणून कोर्टाचा स्टे आल्याशिवाय मार्ग नसल्याचे सांगितले. याबाबत  आसरा एंटरप्रायझेस विकासक म्हणून मी नवी मुंबई पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त परिमंडळ - २, पनवेल, सहाय्यक पोलिस आयुक्त परिमंडळ - २ पनवेल, सन्मानीय न्यायालय, महाराष्ट्र राज्य सरकार यांना देखील पत्रव्यवहार करून न्यायाची दाद मागितली आहे, असे अयाझ मर्चंट यांनी सांगितले. यावेळी इमारतीत घर बुक करणारे ग्राहक आकाश जाधव, माया देवडे, राकेश गमरे, मनीषा केसरे व अन्य विकासक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post