पनवेल / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे खा. निलेश लंके यांचा वाढदिवस ओपन एज्युकेशन या संस्थेच्या कळंबोली पुलाखालच्या शाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन खा. निलेश लंके मित्र मंडळ पनवेलतर्फे करण्यात आले होते. तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर निलेश लंके मित्र मंडळातर्फे ओपन एज्युकेशनच्या कार्याबाबत सन्मान करण्यात आला.
खा. निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ व चित्रकलेचे साहित्य वाटप करण्यात आला. तसेच खा. निलेश लंके यांनी वेळात वेळ काढून व्हिडीओ कॉल करून सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच संपूर्ण प्रकल्प हा आत्मीयतेने समजून घेवून प्रत्यक्ष या प्रकल्पाला भेट देण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, मनपाचे माजी आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोरखशेठ आहेर, उद्योजक दिलीपशेठ कोरडे, सुरेश धवन, दिनेश घोलप, सचिन गोडसे, निलेश शिंदे, अमोल बोडके, विठ्ठल गलांडे, सचिन गायकवाड, गोपीनाथ पठारे, अविनाश कोंडिलकर, शिवाजी वाफारे, तुळशीराम बोरुले आदी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रम आयोजनाचे श्रेय नानाभाऊ करंजुले यांचे असून त्यांनी व उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
