राष्ट्रीय स्पर्धेत स्नेहल पालकर यांनी सुवर्णपदक व रौप्य पदक

 


उरण / विठ्ठल ममताबादे :- मास्टर्स गेम फेडरेशन ऑंफ इंडिया तर्फे आयोजित केलेली ७ वी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा ६ मार्च ते ९ मार्च २०२५ या कालावधीतं राऊरकेला, ओरिसा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वीचे अध्यक्ष आणि श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स आणि करिअर अकॅडमी दादरपाडाचे सहाय्यक प्रशिक्षक स्नेहल राम पालकर यांनी ३५ वर्षावरील पुरुष या वयोगटात सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. तर १५०० मीटर धावणे या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले आहे.

खोपोली येथील सहकारी अमित पांडुरंग विचारे यांनी ४० वर्षांवरील पुरुष गटात ८०० मीटर मध्ये सुवर्णपदक, १५०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि ५ किलोमीटरमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. तसेच त्यांचे मार्गदर्शक मनीष वामन खवळे यांनी ५५ वर्षांवरील पुरुष गटात उंच उडीमध्ये रौप्यपदक आणि तिहेरी उडीमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. या सर्वांची निवड भारतीय संघातर्फे श्रीलंका येथे होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू बळीराम मुंबईकर यांनी तसेच समाजातील विविध मान्यवरांनी कौतुक तसेच अभिनंदन केले आहे. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्र वर्ग, चाहत्यांनी या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post