* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांचा इशारा
खोपोली / मानसी कांबळे :- खालापूर तहसील कार्यालयालातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसताना लाईट, पंखे, एसी सुरूच असतात...अनेक कर्मचारी जबाबदारी झटकून नागरिकांची कामे न करता बाहेर फिरतात, अशी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे केपी न्यूज चैनलचे संपादक फिरोज पिंजारी यांना तहसिलदार अभय चव्हाण यांनी नोटीस बजावली असून कायदेशीर कार्रवाई करण्याचा इशारा दिला आहे.
संपादक फिरोज पिंजारी पत्रकारितेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले पत्रकार आहेत. आजपर्यंत त्यांनी कधीच चुकीची बातमी प्रकाशित केली नाही. नेहमीच जनहिताचे प्रश्न ते आपल्या वृत्तपत्रातून मांडत असतात. ही बातमी देखील जनहिताची असून आचारसंहितेमध्ये नागरिकांची कामे करता येत नाहीत का किंवा जनहिताची बातमी प्रकाशित करता येत नाही का? तरी सुडबुध्दीने संपादक फिरोज पिंजारी यांच्यावर कार्रवाई करण्यात आली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी दिला आहे.