जळगांव / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील भुसावळ येथे एका साखरपुडा समारंभात बागवान वर्किंग कमेटीचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान यांचा बागवान समाजातर्फे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉं. शरीफ बागवान यांनी कमी वेळेत बागवान वर्किंग कमेटीचे कार्य व योजनांबद्दल माहिती दिली व सर्व महाराष्ट्रातील बागवान समाज धारकांना आवाहन केले की, महाराष्ट्र वर्किंग कमेटीचे सदस्य व्हावे व बागवान समाजाला एक मजबूत समाज बनवू या. यावेळी कार्यक्रमाला जळगांव, भुसावळ, मलकापूर, पाचोरा, जामनेर, धुळे, कल्याण, बुलढाणा, अमळनेर, नाशिक आदी ठिकाणातील समाज बांधव व पाहुणे उपस्थित होते.