खालापूर / सुधीर देशमुख :- महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि नाबार्ड (NABARD) यांच्या अंतर्गत स्थापन स्मरण कृषी प्रोड्युसर कंपनी लि. तर्फे शेतकरी सभासदांना शेअर सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. स्मरण कृषी प्रोड्युसर कंपनीचे शेअर्स वाटप करताना कंपनीचे अध्यक्ष राजेंन्द्र पाटील व एमसीडीसी (MCDC) चे जिल्हा समन्वक सूरज काशिद यांनी सर्व जमलेल्या खालापुरमधील स्थानिक शेतकरी, शेअर्स सभासद यांना कंपनीची माहिती दिली. शासन व कंपनीमार्फत होणारे फायदे यावेळी सांगण्यात आले.
या कंपनीसाठी 3 वर्षामध्ये 1500 सभासद शेअर्स शेतकरी यांना एकत्र करण्यास सांगितले आहे, तरी आजपर्यंत या कंपनीचे 310 सभासद झाले असुन खालापुर तालुक्यातील शेअर्स सभासद करायचे आहेत. राजेंन्द्र पाटील यांना महाराष्ट्र शासनातर्फे राज्यपालांच्या हस्ते शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेती व शेतकरी जगला पाहिजे, ह्या भावनेने ही कंपनी स्थापन करून शेतक-यांना एकत्र करण्याचे ते काम करीत आहेत. तरी आपण खालापुर तालुक्यातील शेतकरी शेअर्स सभासद होण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष राजेंन्द्र पाटील (रा. आपटी) यांच्याशी 9822080768 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजेंन्द्र पाटील, जिल्हा समन्वयक सुरज काशिद, ,मोतीराम पाटील, विष्णु पाटील, जयवंत पांगरे, हेमंत पाटील, भरत साळुंखे, राजाराम सावंत, सुधीर मोरे, दत्तात्रय मुसळे, मारुती मुसळे, हरेश मुसळे, विजय मुसळे, सिध्देश मुसळे, श्रीरंग मुसळे, सुधीर देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
