खोपोली / प्रतिनिधी :- यशवंती हायकर्स खोपोली व रायगड पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील जवळपास 45 महिला पोलिस यांनी ॲडव्हेंचर अँक्टिव्हिटी करीत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिलिंगचा अनुभव घेतला.
पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालय सचिव श्रीकर परदेशी, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे स्वतः उपस्थित राहिले. ते फक्त उपस्थित राहिले नाहीत तर त्यांनी स्वतः या अँक्टिव्हिटीचा आनंद घेतला. त्यांच्या बरोबर खालापूर डीवायएसपी विक्रम कदम आणि खोपोली पोलिस निरीक्षक शितल राऊत, पोलिस अधिकारी ठाकरे, एपीआय पूजा चव्हाण यांनीही अँक्टिव्हिटी करीत महिला पोलिसांचे मनधैर्य वाढविले.
अँक्टिव्हिटीची सुरुवात करतांना खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका अर्चना संदीप पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच महिला पोलिसांच्या वतीने सुरुवात खोपोली पोलिस स्टेशनच्या एपीआय पूजा चव्हाण यांनी केली.
असा अनोखा महिला दिन खोपोलीमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास खोपोली पोलिस निरीक्षक शितल राऊत, पोलिस अधिकारी ठाकरे व एपीआय चव्हाण मॅडम यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंती हायकर्सचे मच्छिंद्र यादव, पद्माकर गायकवाड, महेंद्र भंडारे, संदीप पाटील, अर्चना पाटील, सदाशिव पाटील, निखिल गुरव, अरविंद पाटील, प्रणित गावंड, अभिजीत देशमुख, मुकेश गायकवाड, राहुल कोरडे, अजय फाळे, शुभम पाटील, श्रीपाद पवार, अभिजित आंग्रे आदींनी परिश्रम घेतले.
