लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून फोटोग्राफी मार्गदर्शन शिबीर

 

कर्जत / मानसी कांबळे :- लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती विभाग तिवरे यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम, चर्चासत्र राबविले जात  असतात. त्या माध्यमातून 1 फेब्रुवारी रोजी फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जागृती विभाग लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट मुख्य व्यवस्थापक गौतम कनोजे सर, रिसोर्स पर्सन अनिकेत कस्तुरे, अशोक बिस्वास, कम्युनिटी मोबिलायझर राजू ढोले, प्लेसमेंट ऑफिसर तानाजी मिनमिने, दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे संपादक फिरोज पिंजारी, पत्रकार मानसी कांबळे, डॉं. गीतांजली हजारे, कन्हैय्या सोमणे, राजेश भोईर, नीता बडेकर, ललिता लोभी, सारिका झोमटे, विशाल माळी, केशव कवठे, डॉं. सुजाता मिनमिने, सुरज आगिवले, सुभाष ऐनकर, निकेश सावंत, संतोष शिद, प्रकाश कांबडी, मयुरी देशमुख, राहुल कांबळे, भगवान ठाकरे आदी उपस्थित होते. 

प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी मिनमिने यांनी केले. आजच्या तंत्रज्ञान विकसित काळामध्ये प्रत्येक जण फोटो शूट करतो, परंतु त्या फोटोला एक अर्थ, वातावरण कशा पद्धतीने अधिक आकर्षिकरित्या दाखविले जाईल याचे प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन अनिकेत कस्तुरे यांनी केले. फक्त फोटो क्लिक करणे सोपे आहे पण त्यातून एक आकर्षक कलाकृती निर्माण करणे ही कला आहे. अनिकेत कस्तुरे यांच्या मिळालेल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना आनंद तर मिळालाच आणि फोटोग्राफीबद्दल ज्ञानवृद्धी देखील होण्यास मदत झाली.

Post a Comment

Previous Post Next Post