नांदेड / प्रतिनिधी :- नायगाव शहरातील शरदचंद्र महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. हनुमंत हांडे यांनी देश-विदेशातील नामांकित व्यक्ती, राजकीय, बॉलीवूड, थोर विचारवंत, साहित्यिक, कवी, गायक यांचे पेन्सिल स्केचने हुबेहूब असे जवळपास 200 चित्र रेखाटलेल्या चित्र प्रतिमेचे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉं. शंकर विभुते यांच्या हस्ते तर शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. के. हरिबाबु, प्रोफेसर बलभीम वाघमारे, उपप्राचार्य एच. एम. पाटील, प्रोफेसर श्रीरंग वट्टमवार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक प्रशांत बिलवणीकर, प्रा. संजय भालेराव, डॉं. एम. एम. शिंदे, डॉं. शैलेश कांबळे यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितल जोडवाड, प्रतीक्षा गिरी, तेजश्री कानोले, वैष्णवी गिरी या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे प्रा. हनुमंत हांडे यांनी रेखाटलेले चित्र प्रदर्शन भरविण्यास आयोजकाची परवानगी मिळालेले अर्ज प्राप्त झाले आहे.
