अकोट शहरामध्ये हेल्मेट जनजागृती रॅली

 


* सार्वजनिक सुरक्षितता व प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उ‌द्देश

अकोट / मोहम्मद जुनैद :- अकोट उपविभाग व अकोट पोलिस विभागाच्या वतीने अकोट शहरामध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. सार्वजनिक सुरक्षितता व प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उ‌द्देशाने अकोला पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली 1 फेब्रुवारी रोजी अकोट शहरामध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी हेल्मेट घाला, सुरक्षित प्रवास करा आणि आपल्या स्वतःच्या कुटूंबासाठी हेल्मेटचा वापर करा, असे आवाहन नागरिकांना करुन जनजागृती केली. रॅली दरम्यान मोटार सायकलस्वार व नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटवुन सांगण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व अकोट उपविभाग सहायक पोलिस अधिक्षक अनमोल मित्तल यांनी केले. रॅलीमध्ये पोलिस निरीक्षक अमोल माळवे, किशोर जुनघरे, स्थानिक पोलिस स्टेशन अकोट शहर व अकोट ग्रामीण येथील वाहतुकीचे काम पाहणारे वाहतुक अंमलदार गणवेश परिधान करुन 2 मोटार सायकलसह २ वाहतूक अंमलदार, बीट पेट्रोलींग 4 मोटारसायकलसह 8 अंमलदार, दामिनी 2 मोटार सायकलसह महिला पोलिस अंमलदार 4, पोलिस स्टेशन अकोट शहर येथील 48 मोटार सायकलसह 52 अंमलदार, आरसीपी 10 मोटार सायकलसह 20 अंमलदार, एसडीपीओ कार्यालय अकोट येथील 4 अंमलदार 2 मोटार सायकलसह सहभागी झाले होते. ही रॅली पोलिस स्टेशन अकोट शहर येथून निघून प्रथम अकोला नाका, त्यानंतर शिवाजी चौक, मच्छी मार्केट, अंजनगाव रोड, धारोळीवेस चौक, आंबोडी वेस, रामटेकपुरा, शौकतअली चौक, मोठे बारगण चौक, बळीराम चौक, सोमवार वेस, यात्रा चौक, नरसिंग रोड, सोनु चौक, शिवाजी चौक यामार्गांने फिरून परत पोलिस स्टेशन अकोट शहर येथे पोहोचून संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post