* खालापूर नगर पंचायतीमध्ये किशोर पवार यांची सलग चौथ्यांदा पाणी पुरवठा सभापती बिनविरोध निवड
खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर नगर पंचायतीमध्ये 30 जानेवारी रोजी सभापती पदाची निवडणूक पिठासिन अधिकारी तथा कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
खालापूर नगर पंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाची सत्ता असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आदेशाने किशोर पवार यांची सलग चौथ्यांदा पाणी पुरवठा सभापतीपदी बिनविरोध निवड झाली तर उज्ज्वला किशोर निधी यांची बांधकाम सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोढवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, नगरसेविका लता लोते, सुनीता पाटील, नगरसेवक महेश जाधव, गोपी शहा, निशांत पानपाटील, दिनेश फराट, स्वीकृत नगरसेविका शिवानी जंगम व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते. या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.