* तटकरे यांना सत्तेपासून दूर ठेवा...आमदार महेंद्र थोरवे यांचा आरोप
खोपोली / दत्तात्रय शेडगे :- कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात मी काठावर पास झालो हे खासदार सुनील तटकरे यांचेच पाप असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे, ते खालापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार आदिती तटकरे यांनी केलेल्या टिकेला महेंद्र थोरवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महायुती असल्याने महाराष्ट्रात युतीत विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या. मात्र, कर्जत विधानसभा मतदार संघात खासदार सुनील तटकरे यांनी अपक्ष सुधाकर घारे यांना उभे करून मला पाडण्याचे षडयंत्र रचले होते. मात्र, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही कधीही सुनील तटकरे यांना घाबरलो नाही आणि त्यांना कधीही भीक घातली नाही. मात्र या मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना अपक्ष उभे करून त्यांना छुपा पाठिंबा देऊन आर्थिक रसद पुरवली आहे, त्यामुळे महायुतीत राहून महायुतीशी गद्दारी केली असल्याने तटकरे कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आणि भाजपचे तीन आमदार असल्याने महाडचे आमदार भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्री करून त्यांना रायगडचे पालकमंत्री करा. मात्र, राष्ट्रवादीचे एक आमदार आदिती तटकरे ह्या असून त्यांना पालकमंत्री करू करा. हे आम्हाला कदापि मान्य नाही, अशी मागणी आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी केली आहे, असेही महेंद्र थोरवे म्हणाले.