आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा शिवसैनिक सचिन गुरसळ

 


खोपोली / मानसी कांबळे :- एक वर्षापूर्वी सचिन‌ गुरसळ यांनी १७ वर्षाची निष्ठा सोडून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यात त्यांनी मिळगावातील सर्व मित्रांना एकत्रित करून मिळगावात शिवसेनेचे संघटन मजबूत केले. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. सचिन गुरसळ यांच्यावर विभागप्रमुखाची जबाबदारी असतानाच त्याची प्रभागांच्या निरीक्षक पदावर नेमणूक झाली.

याच माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे शिबिर आयोजित केले गेले. मिळगाव, आदोशी, मिळगाव आदिवासी वाडी, मिळगाव धनगरवाडा, मिळगाव ठाकुरवाडी या भागातील सुमारे ३५० महिलांचे फार्म भरून पैसे मिळवुन‌ दिले. यामुळे सचिन गुरसळ यांचा घरोघरी संपर्क वाढून विभागात आपली एक वेगळी ओळख तयार झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदाराचा जोरदार प्रचार...विरोधकांना सडेतोड उत्तर द्यायला सचिन गुरसळ कुठे कमी पडले नाहीत. त्याचप्रमाणे आमदाराचा ग्राऊंडवर उतरून खोपोलीच्या प्रत्येक भागात जावून जोरदार प्रचार करीत आपली छाप प्रचारात त्यांनी सोडली.

कुठल्याही अमिषाला बळी न पडता व आपल्या सहकार्याच्या साथीने सचिन गुरसळ यांनी आपल्या बुथवरून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना चांगल्या मतांची आघाडी दिली. आमदार महेंद्रशेठ थोरवे हे माझे दैवत आहेत. ते मंत्री व्हावेत व‌ लालदिव्याची गाडी आपल्या मतदार संघात यावी ही इच्छा सचिन गुरसळ यांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post