* कर्जतचे नगराध्यक्ष व्हावे अशी शुभेच्छकांची इच्छा
कर्जत / मानसी कांबळे :- राजकारणातील महाभारतात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे सारथी राहून राजकीय युद्ध जिंकणारा जिगरबाज नेता...आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे दुसरे पर्व बघण्यासाठी जिवाचे रान करणारा हा लढवय्या नेतृत्वाचा आदर्श..आमदार साहेबांवर शाब्दिक हल्ले व टीका होत असताना स्वतः ढाल बनून विरोधकांना आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत सडेतोड उत्तर देणारा नेता, संपूर्ण मतदारसंघाने अनुभवला आहे. छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा आधार घेत, राजकीय विरोधकांचे मनसुबे परतवून लावण्याचे आणि पुन्हा एकदा महेंद्रशेठ थोरवे यांना आमदार पदावर विराजमान करण्याचे यश, संकेतजी भासे आपल्या कर्तृत्वाने मिळवले.
तळागाळातील शिवसैनिकांशी नाळ जोडणारा, प्रत्येक शिवसैनिकाला आपले मानणारा आणि दिलदार मनाचा राजा, संकेत भासे हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व आहे. कर्जत नगरपरिषदेचे लोकाभिमुख नगरसेवक अँड. संकेत भासे हे नाव कर्जतच्या विकासासाठी झटणाऱ्या संघर्षशील नेतृत्वाचे प्रतीक आहे.
संकेत भासे यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव झाला. दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे संपादक फिरोज पिंजारी, रायगडची झुंज न्यूजचे संपादक नरेश जाधव, अक्षराज व दैनिक कोकण प्रदेश न्यूज प्रतिनिधी मानसी कांबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर, भाजप नेते दीपक बेहेरे, नितीन कांदळगांवकर, रमेश मुंडे, नम्रता कांदळगांवकर, सुप्रिया भगत, बिराज पाटकर, अनंता हजारे, खालापूरचे निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह कर्जत, खालापूर तालुक्यातील शिवसैनिक, महायुतीचे नेते व हजारों नागरिकांनी नगरसेवक अँड. संकेत भासे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आगामी काळात कर्जत नगरीचे त्यांनी नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.