अन् सेंट मेरी कॉन्व्हेंन्ट स्कूलसमोरील वाहतूक कोंडी सुटली

 

अलिबाग / प्रतिनिधी :- अलिबाग शहरातील सेंट मेरी कॉन्व्हेंन्ट स्कूलसमोर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दखल घेत नागरीकांची तात्काळ वाहतूक कोंडीतून सुटका केली.

सेंट मेरी कॉन्व्हेंन्ट स्कूलमधील असिस्टंट हेड गर्ल कुमारी प्राप्ती दर्शन म्हात्रे हिने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शाळेसमोर एक वाहतूक शाखेकडील अंमलदार शाळेच्या वेळेनुसार मिळावे अशी मागणी केली होती. त्यानंतर तेथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ शाळेच्या वेळेत वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार, सहा. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भाऊसाहेब काळोखे व पोलिस हवालदार सचिन भोसले यांना तेथे वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने नियुक्त केले होते. शाळेच्या समोर पोलिस अंमलदार असल्याने वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवित वाहनधारक कुठेही बेशिस्तपणे वर्तन करत नाहीत, त्यामुळे वाहतूक सुरळीत पार पडत आहे.

कुमारी प्राप्ती दर्शन म्हात्रे हिच्या मागणीनुसार जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तत्काळ वाहतूकचे अंमलदार शाळेसमोर नेमणुकीस ठेवल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला आहे. आपल्या मागणीची तात्काळ दखल घेतल्याने प्राप्ती म्हात्रे हिने जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे व वाहतूक शाखेचे आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post