* न्यायालयीन वकिलाला जिवे मारण्याची धमकी
अलिबाग / प्रतिनिधी :- अलिबाग न्यायालयाच्या आवारात कौटुंबिक हिंसाचाराबाबत चालू असलेल्या केसची सुनावणी झाल्यानंतर १० डिसेंबर रोजी महिला वकिलाला केसमधील विरुद्ध पक्षकार यातील विरोधक याने यातील तक्रारदार यांना तुझी शेवटची केस असेल तुला बघून घेतो, घर तोडण्याची काम करु नको, असे बोलून तक्रारदार यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाणे एनसी नं. 678/2024 भारतीय न्याय संहिता कलम 351(2), (3) प्रमाणे तक्रारदार पल्लवी सत्यजीत तुलपुले व्यवसाय वकील विरोधक सुरज चंद्रकांत क्षीरसागर, कराड जि. सातारा यांनी विरोधक यांच्यावर अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर असल्याचे बोलण्यात आले आहे.