* उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्याने फुल उत्पादक शेतकरी, फुल विक्रेते व समस्त साईभक्तांना मोठा दिलासा
शिर्डी / राहूल फुंदे :- शिर्डी येथे दर्शन रांगेजवळील साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या विक्री स्टॉलचे उद्घाटन माजी खासदार डॉं. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व सर्व संचालक, सभासद, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शिर्डी येथील साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली. त्यामुळे साई मंदिरात हार प्रसाद देण्यास सुरुवात झाली आहे. माजी खासदार डॉं. सुजय विखे पाटील यांनी साई मंदिरात जावून साई समाधीवर पुष्पहार अर्पण केला.
शिर्डीमध्ये साई मंदिरात हार, फुल प्रसाद देण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, हार, फुल, प्रसाद यांच्या किंमती योग्य असाव्यात यासाठी भावफलक लावण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे शिर्डीमध्ये साई संस्थांनच्या एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून प्रवेशद्वार जवळ विक्री स्टॉल टाकण्यात आले आहेत.
कोरोना कालावधीपासून शिर्डी साई मंदिरात हार, फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आता उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्याने फुल उत्पादक शेतकरी, फुल विक्रेते व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे डॉं. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.