रायगड जिल्हा परिषद केंद्र नहावे अंतर्गत 17 शाळांचे खैरे खुर्द शाळेत केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन

रोहा / शहानवाज मुकादम :- रोहा तालुक्यातील खैरे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा येथे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत, हाच उद्देश लक्षात घेऊन रोहा तालुका केंद्र न्हावेचे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. केंद्र प्रमुख दिपक पाबरेकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रातील 17 शाळांनी सहभाग घेतला असून रा. जि. प. प्रा. शाळा खैरे खुर्द उर्दू सेमी इंग्लिश यांनी कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले.

कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभास खैरे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच मुजम्मील गिते, खांबेरे ग्रामपंचायतीचे सरपंच अतिश मोरे, अब्बास मुकादम, इर्शाद पेडेकर, जाधव सर, मुंगसे मॅडम, कांबळे मॅडम व सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि खैरे खुर्द राजिप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल हमीद गिते, उपाध्यक्षा नाजिया मुकादम व सर्व सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी 70 पेक्षा जास्त प्रतिकृतींची मांडणी केली होती. त्यामध्ये पाणी, जमीन, भौगोलिक बदल, हवा व तिचा वापर असे एक ना अनेक विषयांना घेऊन विद्यार्थ्यांनी प्रतिकृत्या मांडल्या होत्या. विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. पालकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण करून प्रथम तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.


-: विजेते स्पर्धक :-

मोठा गट - प्रथम क्रमांक जुहा अब्दुल हमीद नागोठकर (शाळा खैरे खुर्द उर्दू).

द्वितीय क्रमांक सृष्टी मंगेश कासकर व सलोनी सहादेव सातामकर (न्हावे शाळा).

तृतीय क्रमांक उमेरा जमालसाहब धनसे (खैरे उर्दू).

लहान गट - प्रथम क्रमांक श्लोक गोणे व शिवानी विचारे (चणेरा शाळा).

द्वितीय क्रमांक सॉलेहा इस्राईल फकीर (चणेरा हायस्कूल).

तृतीय क्रमांक नवखार शाळा.

टाकाऊ पासून टिकाऊ  - 

प्रथम क्रमांक अस्मा अब्दुल मुनिम गिते.

द्वितीय क्रमांक उमर अमीन मुकादम.

तृतीय क्रमांक मोहमद सालेह अब्दुल हमीद गिते या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post