खालापूर / सुधीर माने :- खालापूर नगरपंचायत हद्दीत गेली अनेक वर्ष वनवे निंबोडे प्रीमियर लीगचे आयोजन तरुण वर्गांकडून होत आहे. सुप्तकलागुणांना वाव देण्यासाठी व तरूण मित्रांनी एकत्र येण्याच्या हेतू प्रित्यर्थ असे सामने होत असतात. यावर्षी देखील 2025 प्रीमियर लीग आयोजन 18 व 19 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.
दोन्ही गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वनवे गावचे पोलिस पाटील मनोज पारठे, सामाजिक कार्यकर्ते पाडुंरंग मगर, जगदीश मगर, युवा सेना शहर अधिकारी अमित जगताप, शिवसेना शहर समन्वय हरेश मोडवे, ज्ञानेश्वर पारठे, हरेश पारंगे व दोन्ही गाव, दांडवाडी येथील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते, श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. दोन दिवशी सामन्यात प्रथम क्रमांकाचा मान प्रिशा इलेव्हन (संघ मालक हरेश मोडवे) संघाने पटकाविला तसेच द्वितीय क्रमांक विघ्नेश इलेव्हन (संघ मालक हरेश पारंगे) टीमने फटकावला. तृतीय क्रमांक श्रेयांस इलेव्हन (संघ मालक श्रीकांत पारठे) यांना मिळाला. उत्तेजनार्थचे मल्हारी इलेव्हन (संघ मालक हरीश ठोंबरे) ठरला. हे सामने बघण्यासाठी दोन्ही गावातील तरुण व वाडीतील असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. चारही संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानचिन्ह देण्यात आले. यामध्ये तेजस मगर, वल्लभ मगर, नितीन पवार, सुमित जोगवडे यांनी काम पाहिले.
