खालापूर / सुधीर माने :- खालापूर तालुक्यात चिंचवली शेकीन येथे दरवर्षी पौष पोर्णिमा उत्सव साजरा होत असतो. सालाबादप्रमाणे 24 व्या वर्षी देखील देवीच्या कृपा आशिर्वादाने गुरुवर्य कै. मधुकर मांडे यांच्या प्रेरणेने सविता धोंडू जाधव यांच्या अधिपत्याखाली देवीचा छबिना उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावर्षी सोमवार, 20 जानेवारी 2025 सायंकाळी 6 ते 7 देवीचा अभिषेक, होम हवन विधी पटवर्धन गुरुजींच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर 7. 30 वाजता स्वर वैभव ताल मंगेश ग्रुप कर्जत यांचा हरिपाठ संपन्न झाला.
रात्री 8 ते 9 भजनाचा कार्यक्रम तसेच रामकृष्ण भजन मंडळ धामणे व खोपोली यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 1 देवीचा छबिना उत्सव व ग्राम प्रदक्षिणा संपन्न झाली. दुपारी 2 वाजता देवीची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन कोकण प्रदेशाध्यक्ष तथा खालापूर वार्ता संपादक सुधीर माने यांच्या सौभाग्यवती सुवर्णा सुधीर माने यांच्या व अंजली सचिन शांताराम गुलिक यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली.
दुपारी 2 ते 3 महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. माऊली भजन मंडळ चिंचवली शेकीन येथील गायिका ज्ञानेश्वरी कुडपणे यांचा संगीत भजन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाकरीता बदलापूर येथून गोविंद दारवे, विनोद जाधव, अजय मांडे, मनोहर दत्तात्रय लांबे, रुपेश पारठे, प्रसाद चौधरी, संतोष घोलप, रवींद्र पारठे, गणेश घोलप, सुशांत रेवले, कुमार कर्नुक, रमण जाधव, सचिन कदम, हभप शिवाजी सुंगदरे, लहुजी चिंचवली, शेडवली, लौजी, बिड खुर्द, खोपोली शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
