* मुकेश रूपवते : खोपोली युवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे !
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहर व आसपासच्या परिसरातील स्थानिक कलाकारांना चालना देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेली 20 वर्षे खोपोली युवा महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आहे. या कार्यक्रमातून अनेक तरुण व तरुणींनी आपले भविष्य घडविले व यशस्वी कलाकार म्हणून सर्वत्र ओळखले जात आहे. अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेला युवा महोत्सव यावर्षी देखील शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी जनता विद्यालय खोपोली रंगमंचावर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन, हेल्पिंग हॅन्ड क्लब खोपोलीमार्फत तसेच स्वर्गीय अमोल जाधव यांच्या स्मरणार्थ आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक आयोजक मुकेश रूपवते यांनी आयोजित केला आहे.
या महोत्सवाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे व त्यांना हक्काचे व्यासपीठ देवून त्यांचे भविष्य घडविणे असून शहरातील सर्व जनतेने खोपोली युवा महोत्सव 2025 मध्ये सहभाग घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक मुकेश रूपवते यांनी केले आहे. तसेच येत्या 24 जानेवारी रोजी नागरिकांनी युथ फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते अनिल मिंडे यांनी देखील केले आहे.

