नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २० जानेवारी २०२५ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. फेब्रुवारी / मार्च २०२३-२४ मध्ये इ. १० वी व १२ वी तसेच इतर शालेय व अभ्यासक्रमेत्तर परीक्षांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संगीत शिक्षक आर. आर. जोशी यांच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावर्षी २९,१६२ रुपयांची रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. ही रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह गावातील सुज्ञ व शिक्षण प्रेमी नागरिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने दरवर्षी दिली जातात.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नगरदेवळा येथील औट पोस्टचे असि. पीएसआय निवृत्ती मोरे होते तर अध्यक्षस्थानी ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस बापूसाहेब शिवनारायण जाधव होते.
याप्रसंगी ग्राम शिक्षण समितीचे संचालक दादासो. किशोर पाटील, अप्पासो जगन्नाथ पाटील, तात्यासो वामन पाटील, दादासो अ. गनी शेठ आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अनामिका राऊळ, कालवा निरीक्षक जलसंपदा विभाग जळगाव हिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पारितोषिक वितरण समिती प्रमुख संजीव बावस्कर यांनी अहवाल वाचन व पारितोषिक वितरणाची संपूर्ण जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांना पारितोषिकांची रक्कम एस. पी. माळी सर यांच्याकडून मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी माता व पिता पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.
दहावी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या तनिष्का योगेश जाधव या विद्यार्थिनीने ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. १० वी उर्दू विभागातून शिफानाज गुलामगौस तांबोळी या विद्यार्थिनीने ९४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.
इ. १२ वी च्या तिन्ही शाखांमधून सिद्धेश विजय पाटील या विद्यार्थ्याने ८२.१७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. १२ वी कला विभागातून अक्षरा भगवानसिंग परदेशी हिने ७९.६७ टक्के तर किमान कौशल्य विभागातून ओम संतोष लोहार या विद्यार्थ्याने ७४.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या प्रसंगी विविध शालेय तसेच अन्य परीक्षांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त ७४ विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमासाठी किरण काटकर सर, व्ही. बी. गहरवाल सर, योगेश ठाकूर सर, ए. सी. आमले सर तसेच पत्रकार प्रकाश जगताप, शैलेंद्र बिरारी, माजी शिक्षकवृंद, इतर सर्व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार सर यांनी तर आभार योगेश ठाकूर सर यांनी मानले.
