♦️शिवमुद्रा बहुद्देशीय मित्र मंडळ आणि सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन आयोजित 'शिवमुद्राचा चिंतामणी' गणरायाचे आगमन...सटाण्याचे बॅन्ड पथक दिमतीला
♦️१२ ऑगस्टला चंदू अण्णानगरात गणरायाचा भव्य आगमन सोहळा
♦️"श्री देव मामलेदार ब्रास बँड, सटाणा" या प्रसिद्ध बँड पथकाचे निनादात "श्री"चे स्वागत
♦️मूर्तिकार श्री नंदन महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेली 26 फूट उंच श्रींची आकर्षक मूर्ती
♦️"इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवा" स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, म्युझिकल चेअर स्पर्धांसह विविध स्पर्धा
जळगांव / महेश शिरसाठ :- येथील प्रभाग क्रमांक ८ आणि चंदू अण्णा नगर परिसरात शिवमुद्रा बहुद्देशीय मित्र मंडळ आणि सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन आयोजित 'शिवमुद्राचा चिंतामणी' गणपती आगमन सोहळ्यानिमित्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी आकाश भालेराव यांची तर उपाध्यक्षपदी वरुण मैराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुतन कार्यकारिणीत खजिनदारपदी हितेश पाटील, मल्हार पाटील, सचिव समाधान पाटील, निखिल नेरकर, मयूर चौधरी, गणेश कुंभार आणि सल्लागार कार्तिक परदेशी, शिव पवार, अक्षय चव्हाण यांचा समावेश आहे. गणेश उत्सवात सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशनचे संचालक लक्ष्मी कुमावत आणि शिवमुद्रा महिला मंडळ यांचाही मोलाचा समावेश आहे. तर जय बजरंग मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांचे देखील अनमोल सहकार्य लाभत आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चंदू अण्णा नगरच्या पुढे, सत्यम रेसिडेन्सी आणि पवार पार्क परिसर तसेच प्रभाग क्र. ८ मध्ये प्रथमच भव्यदिव्य अशा गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याचे आयोजन शिवमुद्रा बहुद्देशीय मित्र मंडळ आणि सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे. हा भव्य आगमन सोहळा १२ ऑगस्ट २०२५, मंगळवार रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार असून, यासाठी मंडळाने मोठ्या तयारीचे आयोजन केले आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि चंदू अण्णा नगर परिसरातील हा पहिलाच आणि सर्वात मोठा श्री गणेश आगमन सोहळा ठरणार आहे. या सोहळ्यात प्रमुख आकर्षण म्हणून मूर्तिकार श्री नंदन महाजन यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेली भव्यदिव्य अशी 26 फूट उंच श्रींची आकर्षक मूर्ती त्या सोबतच "श्री देव मामलेदार ब्रास बँड, सटाणा" या प्रसिद्ध बँड पथकाचे सादरीकरण होणार असल्याचने सोहळ्याला एक वेगळाच रंग देणार आहे. तसेच या सोबत विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी यांचा देखील समावेश आहे.
मंडळातर्फे काही स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी "इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवा" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, जी पर्यावरण पूरकतेचा संदेश देईल. तसेच जळगाव शहरातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, म्युझिकल चेअर स्पर्धा घेण्यात येणार आहेत, जेणे करून महिलांचा सहभाग ही उत्साहात वाढेल. तसेच आगमन सोहळ्यासाठी विशेषतः फोटोग्राफी आणि रिल मेकिंग स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे आणि आकर्षक असे बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे. मंडळाने सर्व गणेशभक्त, नागरिक व कुटुंबियांना या आगमन सोहळ्यात सहभागी होण्याचे मन:पूर्वक आमंत्रण दिले आहे. या भव्य अशा आगमन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष आकाश भालेराव यांनी केले आहे.