* युवा नेत्या शिवानी दळवी, युवा नेते अल्पेश थरकुडे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्या हस्ते उद्घाटन
खोपोली / प्रतिनिधी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय महासचिव तथा भिमकन्या मानसी गणेश कांबळे यांच्या 'माय कोकण 24 तास' वेब पोर्टलचे भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर युवा नेत्या शिवानी मंगेश दळवी, युवा नेते अल्पेश थरकुडे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष तथा दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, क्रिडा (स्पोर्ट्स), क्राईम, मनोरंजनात्मक, अध्यात्मिक बातम्या, लेख देण्यासह सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम संपादिका मानसी कांबळे करतील, असा विश्वास उद्घाटन प्रसंगी व्यक्त करण्यात आला. संपादिका मानसी कांबळे यांनी 'लाईट ऑफ लाईफ' ट्रस्टच्या माध्यमातून पत्रकारीतेचा कोर्स केला असून दै. अक्षराज, सारथी महाराष्ट्राचा वेब पोर्टलला खालापूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले आहे तर दै. कोकण प्रदेश न्यूजला निवासी संपादिका म्हणून काम करीत आहेत. मागील 2 वर्षात मानसी कांबळे यांनी आपल्या लेखणीने खालापूर-कर्जत तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मानसी कांबळे या पत्रकारासोबतच एक चांगल्या कवियित्री देखील आहेत, त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्र, पोर्टलमधून प्रकाशित झाल्या आहेत. 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुभाषनगर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली स्व-लिखित कविता सादर करून भिम अनुयायींची वाहवा मिळवली होती.
संपादिका मानसी कांबळे यांना वडील गणेश चारू कांबळे, आई गिता गणेश कांबळे, भाऊ केतन गणेश कांबळे यांची भक्कम साथ मिळत आहे. 'माय कोकण 24 तास' सुरू झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 1 चे माजी नगरसेवक मंगेश दळवी, नितीन मोरे, युवा नेत्या शिवानी मंगेश दळवी, अल्पेश थरकुडे, उद्योजक गोकुळ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संपत गाढवे, अशोक गिलबिले, शब्बीर शेख, इस्राईल मन्सुरी, फारूक शेख, मिलिंद शिंदे, आनंद सोनवणे, जितू गेहलोद, कृष्णा (बाबू) किलंजे, फरीद शेख, सुखदेव बट्टेवार, सचिन सावंत, संतोष आत्माराम गायकवाड, संतोष नामदेव गायकवाड, चेतन कांबळे, वामन शिंदे, आकाश कांबळे, यश गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड, किरण गायकवाड, शशिकांत सोनवणे, समाधान कांबळे, जावेद पटेल, युसुफ शेख, शाहरूख शेख आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच नविन वेब पोर्टल सुरू केल्याबद्दल न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण कोळआपटे, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा सना बेगम, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय महासचिव अश्वनी कुमार, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, सचिव ॲंड. अरविंद कुमार, सचिव धवल माहेश्वरी, राष्ट्रीय सहसचिव लतेश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉं. अकबर शेख, राष्ट्रीय युवा सचिव फैजान सुर्वे, राष्ट्रीय कमिटी सदस्य किशोर कुमार मोहंती, राष्ट्रीय प्रसिध्दी प्रमुख तुषार तानाजी कांबळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, महिला प्रदेशाध्यक्षा इशिका शेलार, महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रतिभा शेलार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉं. अर्चना मेडेवार, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तनुजा गुळवी, हरियाणा प्रदेश अध्यक्ष हेमेंद्र कुमार शर्मा, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष आनंद कुमार राजनौली, प्रदेश संयोजक रविश हेगडे, उत्तर प्रदेश महासचिव अनिस कुरेशी, उत्तर प्रदेश उपाध्यक्ष कमल शुक्ला, राजस्थान प्रदेश अध्यक्ष ओम प्रकाश जैन, ओडीशा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद कुमार रॉय, मध्य प्रदेश सचिव अयाज हुसैन, महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनिल कुमार पालिवाल, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन पाटणकर, अकोला जिल्हाध्यक्ष मो. जुनेद मो. युसुफ, ठाणे जिल्हा संयोजक श्रीकांत म्हात्रे, नांदेड जिल्हा महासचिव जावेद अहमद, रायगड जिल्हा सचिव सागर जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, कर्जत तालुका अध्यक्ष पंकेश जाधव, रोहा तालुका अध्यक्ष याकुब सय्यद, खोपोली शहर सचिव परमेश्वर कट्टीमणी, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रविंद्र सकपाळ, हर्ष कसेरा, पत्रकार संतोष मोरे, संतोष गोतारणे, गणेश मोरे, किशोर साळुंखे आदींनी अभिनंदन केले आहे.