वडवलीतील शांत, निरागस 'निसर्ग' फॉर्म हाऊस

* 'वन डे पिकनिक'साठी उत्तम ठिकाण

* स्वस्तात मस्त पिकनिकसाठीची जागा

* शाकाहारी-मासांहारी जेवणाचा उत्तम बेत

* भिवपुरी रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळच

मुंबई, पुण्याच्या धावपळीतून काही क्षण निवांत घालवावे...परिक्षांच्या तणावातून आपल्या मुलांना बाहेर काढावे, पण नोकरी, व्यवसायामुळे कुठे जाता नाही तर अशा परिस्थितीत कर्जत तालुक्यातील वडवली येथील निसर्ग फॉर्म हाऊस एक उत्तम पर्याय ठरत आहे. कर्जत-मुंबई लोकल रेल्वे मार्गांवरील भिवपुरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 3 किलोमीटर तर कर्जत रेल्वे स्टेशनपासून 10 किलोमीटर लांब हे ठिकाण असून निर्सगाच्या सानिध्यात वसलेले हे फॉर्म हाऊस 'वन डे पिकनिक'साठी उत्तम ठिकाण आहे. नावाप्रमाणेच या ठिकाणी चहूबाजूला वृक्षवल्ली पसरली आहे. फळांचा राजा आंब्याची हिरवीगार झाडे...सोबतच सिल्व्हर ओक, कॉफी, चिकू, नारळ, ब्लॅक पेपर आदी उंचच उंच वाढलेल्या झाडांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. 


या ठिकाणी वाढदिवस, लग्न समारंभासह लहान-मोठे कार्यक्रम साजरे करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. सोयीसुविधा युक्त 12 रूम असून 10-15 जणांना एकाच ठिकाणी रात्र घालवता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. स्वच्छता, पुरेसे पाणी, इन्वर्टर, सीसीटिव्ही कॅमेरे यासह शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे. आलिशान किचन असल्याने एकाच वेळी 100 - 150 लोकांचे जेवण बनविण्याची सुविधा उपलब्ध आहे. एकत्र बसून जेवण करण्यासाठी पुरेशी जागा येथे उपलब्ध आहे. 


2012 मध्ये सुरू झालेल्या या शांत, निरागस निसर्ग फॉर्म हाऊसला आतापर्यंत हजारों पर्यटकांनी भेट दिली आहे. या फॉर्म हाऊसमध्ये 12 रूम असून 2 स्विमिंग पूल आहेत. लहान मुलांना पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेता यावा, यासाठी एक लहान स्विमिंग पूल देखील बनविण्यात आला आहे. सोबतच लहान मुलांसाठी झुला, इनडोअर व आऊट डोअर गेम...ज्यात पूल टेबल, चेस (शतरंज), कॅरम, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट आदी खेळ येथे खेळता येतात. यासोबतच असह्य उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी 'रेन डान्स'चा ही आनंद घेता येईल. येथील जेवणाची तर मज्जाच वेगळी आहे. अनलिमिटेड बुफे पध्दतीचे अस्सल कोकणी, मालवणी, आगरी, मराठा जेवणाने मन तृप्त होईल. साडे तीन एकरातील 2 एकर जागेवर फॉर्म हाऊस आहे तर उर्वरीत जागेत झाडाझुडपांमुळे जंगलात फिरल्याचा 'फिल' घेता येतो. तसेच काही पक्षी, ससे व मोठा फिश पॉट असून त्यात विविध जातीचे रंगबेरंगी मासे आहेत. 


* चला होवू या सज्ज :- अशा सुट्टीसाठी सज्ज व्हा जी तुम्हाला पूर्णपणे तणावमुक्त करेल आणि तुमचा उत्साह परत आणेल. वडवली येथील निसर्ग फॉर्म हाऊस हे आकर्षक झाडाझुडपांनी आणि आनंदी वातावरणाने वेढलेले आहे.

निसर्ग फॉर्म हाऊस हे असे एक ठिकाण आहे जे त्याच्या परिसरात असलेल्या हिरव्यागार झाडांमुळे आणि सोयी सुविधांमुळे पुनरुज्जीवन देते, तुम्ही आराम करू शकता किंवा तुमच्या प्रियजनांसोबत अनेक क्रियाकलापांसह मजा करू शकता. निसर्ग फॉर्म हाऊसमधील प्रशस्त, आरामदायी आणि आलिशान खोल्या नैसर्गिक लँडस्केपचे मनमोहक दृश्ये देतात.

* कसे येणार :- कर्जत-मुंबई लोकल रेल्वे मार्गांवरील भिवपुरी रेल्वे स्टेशनपासून 3 किलोमीटर तर कर्जत रेल्वे स्टेशनपासून 10 किलोमीटर लांब आहे. तसेच खोपोली, खालापूर, सुधागड, पनवेलपासून ही खासगी वाहन, टॅक्सी, रिक्षेने येता येते. 


* काय काय सुविधा :- मोठ्यांसाठी एक तर लहान मुलांसाठी एक असे 2 स्विमिंग पूल. लहान मुलांसाठी झुला, इनडोअर व आऊट डोअर गेम...ज्यात पूल टेबल, चेस (शतरंज), कॅरम, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट आदी खेळ येथे खेळता येतात. सोबतच रेन डान्सचाही मनमुराद आनंद लुटता येईल. 

* जेवणाची व्यवस्था :- निर्सगाच्या सानिध्यात कोकणी, मालवणी, आगरी, मराठा पध्दतीच्या शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी हलका पुल्का नाश्ता, रात्रीचे जेवण मिळेल. 

* बुकींगसाठी संपर्क :- निसर्ग फॉर्म हाऊस, वडवली गांव, कडावपासून जवळ, कर्जत, जि. रायगड - 410201 (मो. 9702727229). 


 * प्रतिनिधी - नरेश जाधव (98500 31481), शब्दांकन - फिरोज पिंजारी

Post a Comment

Previous Post Next Post