* माथेरान दस्तुरी नाका येथे दुसऱ्यांदा आमदारांनी केली पाहणी
* अश्वपालक, हात रिक्षा, ई रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या प्रशासनाला सूचना
कर्जत / प्रतिनिधी :- माथेरान हे जागतिक पर्यटन स्थळ असून येथे पर्यटकसंख्या वाढविण्यासाठी आणि स्थानिकांना अधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने १ एप्रिल रोजी माथेरान येथील दस्तुरी नाका येथे झालेल्या या बैठकीत माथेरान अश्वपाल संघटना, ई-रिक्षा संघटना, कुली संघटना, मालवाहतूक संघटना तसेच स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक सहभागी झाले होते.
या बैठकीत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करण्यावर भर देण्यात आला. तसेच व्यवसाय वाढीसाठी विशिष्ट नियमावली तयार करून ती अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये स्थानिकांच्या सूचना आणि गरजांनुसार आवश्यक बदल करण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी दर आठवड्याला नियमित बैठक आयोजित केली जाईल व यामध्ये सर्व माहितीचा आढावा घेतला जाईल.
याप्रसंगी माथेरान अधिक्षक सुरेंद्र ठाकूर, माथेरानचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे, वनक्षेत्रपाल उमेश जंगम, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सोने, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, मुळवासी अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंगाडे, ॲड. संतोष आखाडे, माजी सभापती अमर मिसाळ , नेरळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच मंगेश म्हसकर, शिवसेना तालुका सचिव अंकुश दाभणे, जयवंत साळुंखे, प्रमोद नायक, गौरंग वाघेला, नेरळ माथेरान टॅक्सी युनियनचे अध्यक्ष प्रवीण पोलकम तसेच मुळवासी अश्वपाल संघटनेच आणि टॅक्सी युनियनचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या यशस्वी मध्यस्थीबद्दल सर्व संघटनांनी व ग्रामस्थांनी आ. महेंद्र थोरवे यांचे आभार मानले.