५४ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जनजागृती कार्यक्रम

* तळोजा एमआयडीसी येथे टीएमएतर्फे वॉकाथॉनचे आयोजन

तळोजा / प्रतिनिधी :- राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दरवर्षी प्रमाणे ४ मार्च ते ११ मार्च २०२५ दरम्यान साजरा केला जात आहे. या निमित्ताने तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएमए) तर्फे डिश-रायगड आणि मार्ग ग्रुप फॉर इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च २०२५, बुधवार रोजी सकाळी ९ वाजता तळोजा एमआयडीसी येथे वॉकाथॉन - सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यात जनजागृती टीएमए अध्यक्ष शेखर शृंगारे यांच्या वॉकाथॉनची थीम सुरक्षा आणि कल्याण हे विकसित भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. वॉकाथॉनची सुरुवात पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (अमूल फॅक्टरी) एमआयडीसी वॉकाथॉन टीएमए इमारतीजवळ समाप्त झाली. त्यानंतर समारोप सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम टीएमए इमारतीत मोठ्या उत्साहात प्रेरणा देणारा ठरला.

वॉकाथॉनदरम्यान वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनात घोषवाक्य, सूचना दर्शक पोस्टर, स्लोग्न, निबंध अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सहभागी कर्मचारी सदस्य उद्योगांनी सुरक्षा विषयावर घोषवाक्ये व पोस्टर्स तयार करून वॉकाथॉनमध्ये सहभागी होताना ते दर्शवले. या स्पर्धेचे परीक्षण परीक्षकांद्वारे विजेत्यांना भेट वस्तू व  प्रमाणपत्र देण्यात आले. अमूल, टेक्नोवासारख्या अनेक कंपन्याकडून विशेष सहकार्य करण्यात आले. टीएमए सर्व सदस्य उद्योग, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी व नागरिक, पोलिस प्रशासन व एमआयडीसी अधिकारी कर्मचारी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post