* मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा पुढाकार
कर्जत / जयेश जाधव :- कर्जत शहरात प्रवेश करणारा महत्वाचा रस्ता जेथून सुरू होतो त्या कर्जत चारफाटा येथून पुढे जाणारा रस्ता खड्डेमय झाला होता. त्या खड्ड्यांमुळे वाहनचालक संतप्त झाले होते. याबाबत अनेक वर्तमानपत्रांतून खड्ड्याच्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी देखभाल दुरुस्ती असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळ यांना तातडीने खड्डे भरा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता.
याबाबत मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष पाटील यांनी स्वतः प्रत्यक्षात एमएसआरडीसी यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर खड्डे भरण्याची मागणी केली होती. यांची तत्काळ अधिकारी वर्ग यांनी तातडीने दखल घेत श्रीराम पूल ते कर्जत चारफाटा भागातील रस्त्यावरील सर्व खड्डे नव्याने डांबरी पॅच भरले जात आहेत. दरम्यान, सर्वप्रथम मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पुढाकार घेऊन व त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे कर्जत चारफाटा ते श्रीराम पूल येथे येणारा खड्डेमय रस्ता खड्डेमुक्त बनला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे जनमानसातून कौतुक होत आहे. कर्जत चारफाटा येथील महत्त्वाच्या सर्कलवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे वाहनांना तसेच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जत चारफाटा मुख्य सर्कल या ठिकाणी कर्जत चौक, कर्जत-मुरबाड, कर्जत-कल्याण, कर्जत रेल्वे स्टेशन, या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या संख्येने असते. त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात देखील सतत होत असतात. तसेच खराब रस्त्यामुळे स्थानिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, तर शनिवार रविवार व सणासुदी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने बाहेरील पर्यटक कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसेस आणि माथेरान या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे कर्जत चारफाटा मुख्य सर्कलवर खड्डे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी ट्रॅफिकचीही समस्या निर्माण होते.