स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

माढा / विराज कुंभेजकर :- स्वामी समर्थ प्रतिष्ठान माढा यांच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला आहे.

31 मार्च रोजी या निमित्ताने अभिषेक, आरती, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्वामी समर्थांची आरती स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन रमेश बेंबळकर यांच्या हस्ते होणार आहे. तरी स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, अशी माहिती स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक (काका) कुंभेजकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post