जागतिक पर्यटन असलेले माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुले!

* आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीने तोडगा

कर्जत / प्रतिनिधी :- जागतिक पर्यटनस्थळ असलेले माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद आ. महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आला आहे. या संदर्भात आ. थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शासन व प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा, स्थानिकांच्या मागण्या आणि पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बंदमुळे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आ. थोरवे यांच्या प्रयत्नांमुळे तोडगा निघाल्याने आता माथेरानमध्ये पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सहकार्याने पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. स्थानिक व्यावसायिक, हॉटेल मालक आणि टांगा चालकांनी आ. महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहेत. पर्यटकांसाठी माथेरान हे सुरक्षित आणि सुखद पर्यटनस्थळ राहील, यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही आ. थोरवे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post