न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी ईशिका शेलार यांची नियुक्ती

 


खोपोली / अनिल पवार :- देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सहज सेवा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा, अश्वपरिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, सहज न्यूज पोर्टल व सहज समाचारच्या संपादिका ईशिका शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सना बेगम यांनी संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख शेखर जांभळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांच्याशी चर्चा करीत ही नियुक्ती केली आहे. 

सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध समाजसेवक डॉं. शेखर जांभळे यांच्या माध्यमातून समाजसेवा, व्यवसाय व पत्रकारिता या क्षेत्रात सातत्याने निरंतर उत्तुंग कार्य करणाऱ्या ईशिका शेलार यांच्या निवडीने प्रभावी कार्य घडेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

राज्यभरातील महिला पत्रकारांच्या पाठीशी आपण उभे राहू तसेच शासकीय जाचातून पत्रकारांची सुटका कशी होईल ? यासाठी प्रयत्न करू. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संघटनेच्या तत्वानुसार आपण महिला पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्षा ईशिका शेलार यांनी व्यक्त केली. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन ही संघटना पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी यांचा स्वाभिमान कायम ठेवत पत्रकार आणि त्यांचे कुटुंब यांचे आरोग्य...पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता...पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन...पत्रकारांचे घर...पत्रकारांना इन्शुरन्स...पत्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण... पत्रकारांना पार्ट टाईम व्यवसायासाठी मदत..पत्रकारांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामंडळ...पत्रकारांची नोंदणी...डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांची नोंदणी, तसेच महिला पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील राहिन, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्षा ईशिका शेलार यांनी व्यक्त केली.

या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण कोळआपटे, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, महिला राष्ट्रीय अध्यक्ष सना बेगम, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय महिला महासचिव मानसी गणेश कांबळे, राष्ट्रीय महासचिव अश्वनी कुमार, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, सचिव ॲंड. अरविंद कुमार, सचिव धवल माहेश्वरी, राष्ट्रीय सहसचिव लतेश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉं. अकबर शेख, राष्ट्रीय युवा सचिव फैजान सुर्वे, राष्ट्रीय कमिटी सदस्य किशोर कुमार मोहंती, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रतिभा शेलार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉं. अर्चना मेडेवार, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तनुजा गुळवी, हरियाणा प्रदेश अध्यक्ष हेमेंद्र कुमार शर्मा, कर्नाटक प्रदेश संयोजक रविश हेगडे, उत्तर प्रदेश महासचिव अनिस कुरेशी, उत्तर प्रदेश उपाध्यक्ष कमल शुक्ला, राजस्थान प्रदेश अध्यक्ष ओम प्रकाश जैन, ओडीशा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद कुमार रॉय, मध्य प्रदेश सचिव अयाज हुसैन, महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनिल कुमार पालिवाल, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन पाटणकर, अकोला जिल्हाध्यक्ष मो. जुनेद मो. युसुफ, ठाणे जिल्हा संयोजक श्रीकांत म्हात्रे, नांदेड जिल्हा महासचिव जावेद अहमद, रायगड जिल्हा सचिव सागर जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, रोहा तालुका अध्यक्ष याकुब सय्यद, खोपोली शहर सचिव परमेश्वर कट्टीमणी, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रविंद्र सकपाळ, हर्ष कसेरा आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post