* ओव्हर हाईट माल रस्त्यावर...
पनवेल / साबीर शेख :- पनवेल तालुक्यातील कोन सावळा मार्गांवरील नारपोली या वळणाच्या उतारावर ट्रक न. UP /75 /4835 ट्रक ड्रायव्हरने बेजबाबदारपणे ओव्हर हाईटचा माल भरल्याने तो वळणावर तोल जावून रस्त्याच्या मधोमध पडल्याने अपघात होता होता वाचला. पडलेला माल खराब न व्हावा म्हणून त्याने वाहन बाजूला न घेता बिनधास्तपणे मधोमध उभा ठेवला. त्यामुळे एकीकडून चढ व दुसरीकडून उतार असलेल्या वळण रस्त्यावर अनेक प्रवासी वाहन धारकांचा ट्रक ड्रायव्हर ने 1 तास जीव धोक्यात ठेवला होता. ओव्हर हाईटसाठीच्या तुटपुंज्या दंडात बिनधास्तपणे वाहन कायदा मोडणारे ट्रान्सपोर्ट कर्मचारीमुळे रस्त्यावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या ठिकाणी भर रस्त्यावर धोकादायक असे वळण असताना ही कायद्याची व सुरक्षितेची परवा न करता निवांतपणे रस्ता अडवून हमाल आणण्यासाठी गेलेला ड्राइवर म्हणजे प्रवाश्यांसाठी मृत्यू घंटाच चालू होती. असे ड्राइवर असुरक्षित प्रवास करुन कुणाचा जीव घेईल, या बाबतीत चिंता वाटावी, अशी माहिती ड्राइवरच्या सहाय्यकाने पत्रकार साबीर शेख यांना दिली.
ड्राइवर, ट्रान्सपोर्टर व कंपनीचा बेजबाबदारपणा म्हणजे कमी पैशात जास्त माल वाहतूक करण्यासाठी केलेल्या या ओव्हर हाईटच्या उपायोजना यावर कोन ट्रॅफिक वाहतूक नियंत्रण विभागाकडे तक्रार करण्यात आली. आता त्यावर असा माल वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट तसेच माल देणारा कंपनी व्यवस्थापनावर काय कार्यवाही होईल याच्याकडे प्रतिनिधी पाठपुरावा घेत आहे.
