* मान्यवरांच्या हस्ते पहिला हप्ता ही वितरीत
कोल्हापूर / किशोर जासूद :- जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे महाआवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्र. २ मधील मंजुर लाभार्थींना अंबप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच दीप्ती विकासराव माने, उपसरपंच अशिफ अबुबकर मुल्ला, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माने, माजी सरपंच विश्वनाथ पाटील, पोलिस पाटील पंढरीनाथ गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उंडे, हातकणंगले संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तानाजी ढाले, माजी सरपंच वंदना चिबडे, ग्रामपंचायत सदस्य माणिक दाभाडे, अजित माने, रेखा गायकवाड, संगीता जाधव, सरिता कांबळे, सारिका हिरवे आणि जयश्री शिंदे यांच्या हस्ते मंजुरीपत्र व पहिला हप्ता वितरीत करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी डी. व्ही. शिंदे, रोजगार सेवक संदिप डोंगरे, ग्रामपंचायत कर्मचारी सरिता वाघमोडे, पंकज अंबपकर, आरती जाफळे, स्वप्निल कांबळे, घरकुल लाभार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
