यंगस्टार्सला जागतिक महिला दिनाला उस्फुर्त प्रतिसाद

 

वसई / नरेंद्र एच. पाटील :- महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यंगस्टार्सचे व्यासपीठ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून नृत्य, फॅशन शो, विनोदी उखाणे, काव्यवाचन, नकला आणि विविध खेळ अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जुने विवा काॅलेजला करण्यात आले होते. या लकी ड्रॉमध्ये पाच पैठण्या विशेष आकर्षण ठरल्या. प्रणिता म्हापणकर, सुचित्रा पितळे, सुनंदा काळे, कृत्तिका कदम आणि प्रिती परब या पाच महिलांनी पैठणी साडीसाठी आपले नशिब आजमावले.

लोकगीत, लावणी, सामाजिक संदेश देणारे अशा विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले. प्रथम मुक्या काविणकर, द्वितीय ममीज ऑफ ग्रुप, तृतीय संजना वेतुरकर तर अस्तित्व संघ आणि सोनल लोखंडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.   

काव्यवाचन प्रथम सुजाता साळवी, द्वितीय अर्चना जैन, तृतीय प्रांजली चव्हाण प्रतिभा नवघरे आणि कांदबरी मुद्रस यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. उखाण्यात प्रथम गीताश्री नाईक, द्वितीय अंजली कदम, तृतीय प्रणिता कांबळे, उत्तेजनार्थ अनुष्का घाडीगांवकर आणि स्वाती नाईक यांना मिळाले. 

फॅशन शो हा पारंपरिक व वेस्टर्न अशा पेहरावमध्ये करण्यात आला होता. सिनियर काॅंलेजच्या प्राचार्य दिपा वर्मा यांनी परिक्षण केले. नृत्याचे परिक्षक कोरिओग्राफर श्रुती दास तर काव्यवाचन व उखाणे परिक्षक म्हणून साहित्यिका कवयित्री पल्लवी बनसोडे यांनी काम पाहिले.    

रसिकमय दाद नीता पाठकने मिळवली. सर्वच महिलांनी धमाल मस्ती करीत आनंद लुटला. वय वर्ष तीन ते साठ वयोगटातील तब्बल 300 महिलांनी सहभाग नोंदवित कार्यक्रमात रंगत भरली.      

लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अजीव पाटील यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  किरण ठाकूर, हार्दिक राऊत यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. ट्रॅफिक पोलिस सपना पाटील तसेच माजी सभापती चिरायू चौधरी, नगरसेविका रिटा सरवैया, रंजना थालेकर, हेमांगी पाटील, वासंती पाटील, रुपानी मॅडम, मीनल पाटील, उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले यांनी उपस्थिती लावली.      

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सुरेखा कुरकुरे यांनी केले तर महिलांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक मिलिंद पवार, मिलिंद पोंक्षे, तानाजी पाटील सर, जान्हवी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post