मा. आ. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेवाडीत रक्तदान शिबीर

माळशिरस / प्रतिनिधी :- विधानसभा मतदारसंघाचे  माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन तुळजाभवानी मंदिर, शिंदेवाडी येथे ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ यांनी केले होते.

कार्यशैलीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे हित हेच आपले हित या वाक्याप्रमाणे डिजीटल बॅनरचा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी रक्तदान शिबीर शिंदेवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता तुळजाभवानी मातेचे पुजन करून शिबीराचा प्रारंभ झाला. यावेळी 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले व रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा मानवतेचा संदेश दिला तसेच रक्तदान करणा-या प्रत्येकाला प्रमाणपत्र व भेट वस्तु देण्यात आली.

मा. आ. राम सातपुते यांचे शिंदेवाडी येथील अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय सुरज शिंदे, रविराज भगत, सचिन मदने, अमोल भोसले, हनुमंत शिंदे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले व यशस्वीरित्या संपन्न केले.

या रक्तदान प्रसंगी सिद्धेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post