अकोला / मोहम्मद जुनैद :- मोताळा येथील शिक्षक अफरोज खान अहमद खान यांना राष्ट्रस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त अभिनेत्री नयना आपटे व अभिनेत्री साक्षी नाईक यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथे रविवारी (ता. 9) सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
ग्लोबल गोल्ड टॅंलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई यांनी शिक्षक अफरोज खान अहमद खान यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान केला आहे. अफरोज खान हे मोताळा येथील जवाहर उर्दू कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्ना खंडेलवाल, अनघा जाधव, अँटी पायरसी सेलचे रामजीत गुप्ता, संस्थाध्यक्ष मेघा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
