खालापूर न्यायालयात आरोग्य शिबीर संपन्न

* खालापूर वकील संघटना व लायन्स क्लब यांचा संयुक्त उपक्रम 

खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर वकील संघटना व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्य न्यायमूर्ती खंदारे साहेब तसेच न्यायमूर्ती देशमुख मॅडम, न्यायमूर्ती खोत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. 

खालापूर कोर्टातील तिन्ही न्यायमूर्तींचे स्वागत करण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती खंदारे साहेब यांचे स्वागत माजी अध्यक्ष एडवोकेट आनंद गायकवाड, न्यायमूर्ती देशमुख मॅडम यांचे स्वागत स्मिता पाटील चोगले तसेच न्यायमूर्ती खोत मॅडम यांचे स्वागत युवा बारचे विद्ममान अध्यक्ष एडवोकेट सतीश पवार यांनी केले. माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांचे स्वागत अर्चना ठोंबरे यांनी केले. किशोर पाटील यांचे स्वागत ॲंड. केदारी यांनी केले. भोईर यांचे स्वागत सुषमा ठोंबरे यांनी केले. डॉं. सुब्रमण्यम मॅडम यांचे स्वागत एडवोकेट सरिता वाघमारे यांनी केले. डॉं. जाधव यांचे स्वागत एडवोकेट मालकर यांनी केले. जाधव यांचे स्वागत एडवोकेट केदारी यांनी केले. अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांचे स्वागत एडवोकेट चाळके मॅडम यांनी केले. सरकारी अधिवक्ता एडवोकेट गवई व एडवोकेट घोलप मॅडम यांचे स्वागत युवा बार तर्फे करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती खंदारे साहेब, न्यायमूर्ती देशमुख मॅडम, न्यायमूर्ती खोत मॅडम, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिराचा लाभ वकील, पोलिस वर्ग तसेच खालापूर कोर्टात येणारे पक्षकार, सर्वसामान्य जनतेने घेतला. या शिबिरास माजी अध्यक्ष अँड. आनंद गायकवाड, माजी अध्यक्ष ॲंड. संदेश साहेबराव धावारे, माजी अध्यक्ष ॲंड. जयवंत पाटील, युवाबारचे अध्यक्ष ॲड सतिश पवार, अँड. मयूर कांबळे, अँड. गौतम कुमार, अँड. सुरावकर, अँड. वाडेकर, अँड. संदीप पवार, अँड. सविन मोहिते, अँड. आर. जी. पाटील, अँड. पालांडे, अँड. नवनीत साळवे, अँड. राजेंद्र वेरुणकर, अँड. दर्शन पाटणकर, अँड. सचिन पाटील, अँड. सुजाता पाडवी, अँड. शमिका दळवी, अँड. आरती गुप्ता, अँड. प्रबळकर, अँड. अंकिता पुळेकर, अँड. रवी राणावत, अँड. सनी भेलसेकर, अँड. अनिकेत विचारे, अँड. नितीन गायकवाड, अँड. सलील घाटवळ, खालापूर कोर्टाचे सहाय्यक अधीक्षक आणि दळवी बेलीफ, कांबळे शिपाई वर्ग वाबळे, राऊत, रोडेकर, साळवी, अपोलो हॉस्पिटल व नायर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि नर्स आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अँड. संदेश साहेबराव धावारे यांनी तर आभार अँड. कृष्णा साळुंखे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post