जापनीज इन्सेफेलाईटीस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 


* रायगड जिल्ह्यातील 1 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणार लस 

कर्जत / प्रतिनिधी :- जापनीज इन्सेफेलाईटीस हा एक गंभीर आजार असून त्याने अपंगत्व येण्यास कारणीभूत आहे. जापनीज इन्सेफेलाईटीस या विषाणूमुळे हा आजार होतो. हा आजार संसर्गित डासामुळे पसरतो. त्यासाठी हा आजार होऊ नये म्हणून लस तयार करण्यात आली आहे. सदर लस रायगड, पुणे व परभणी या जिल्ह्यातील 1 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना 1 मार्चपासून देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोहळा कर्जत उपजिल्हा रुग्णालय यांच्या अनुषंगाने कर्जत महिला मंडळ यांच्या विद्या विकास मंदिर येथे आयोजित करण्यात आले होता.

या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉं. नितीन गुरव यांचेकडून सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमाला कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील मेट्रोन सविता पाटील, डॉं. जयश्री म्हात्रे, डॉं.  लक्ष्मीकांत तलवारे, डॉं. अरविंद पोवार, डॉं. किरण सोनवणे, डॉं. प्रियंका वाणी, फार्मासिस्ट जितेंद्र राठोड, केवल वारीक, एएनएम ज्योती ओव्हाळ, शिल्पा जाधव, महिला मंडळ संस्थापिका मिना प्रभावळकर, महिला मंडळ मुख्याध्यापिका स्नेहा गाडे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य (RBSK) अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आयसीडीएस (ICDS) अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार टीबी सुपरवायझर रविंद्र माने यांनी मानले. 

Post a Comment

Previous Post Next Post