* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान
खोपोली / प्रतिनिधी :- महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील महालक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या वतीने विविध माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या महिला भगिणींचा सत्कार करण्यात येत आहे. महालक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश महिला संयोजक प्रतिभा शेलार यांच्या संकल्पनेतून खोपोली व खालापूर तालुक्यातील महिला भगिणींचा देखील सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येत आहे.
न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून खोपोली नगर परिषदेतील संगणक अभियंता प्रज्ञा गोसावी, महिला व बालकल्याण विभाग लिपिक मीना गायकवाड तसेच नागरी सुविधा केंद्रातील महिला कर्मचारी प्राची शिंदे, श्रेया उमटे, प्रणाली किलंजे, स्नेहा गायकवाड, कविता जंगले, सानिका गायकर, सोनाली मलबारी, शिवसेना (शिंदे गट) महिला पदाधिकारी भावना संतोष नायडू, पल्लवी देसाई यांचा सत्कार करण्यात आला.