अलिबाग / प्रतिनिधी :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्वांनी तात्काळ ई-केवायसी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्यातील रेशन कार्ड धारकांना घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी अँप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारही शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 30.92% लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. सुरुवातीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ती वाढवून 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना रेशनचे धान्य मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. अनेक कार्डधारकांना अंगठ्याचे स्कॅनिंग ई-पॉस मशीनवर होत नसल्यामुळे त्रास होत होता. आता त्यावर तोडगा म्हणून ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जावून लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.
* मेरा ई-केवायसी अँप :- लाभार्थ्यांना खालील दोन अँप डाउनलोड करावे लागतील.
१. मेरा ई-केवायसी अँप
२. आधार फेस आरडी सर्व्हिस अँप
* खालील लिंक्सवरून अँप डाउनलोड करावे :-
- मेरा ई-केवायसी मोबाईल अँप
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
- आधार फेस आरडी सर्व्हिस अँप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd