* आमदार राजेश मोरे यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
ठाणे / अमित जाधव :- कल्याण-कल्याण तळोजा मेट्रो 12 मार्गांचे काम मागील जवळपास वर्षभरापासून सुरू आहे. या मेट्रो मार्गांत ज्या शेतकऱ्यांच्या जागा बाधित होत आहेत, त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा. ज्याद्वारे कामाचा वेग वाढविता येऊ शकेल, त्याचबरोबर या कामात काही अडथळे आहेत का ? आणि असल्यास ते कशाप्रकारे सोडवता येऊ शकतील. शिवाय ग्रामस्थांच्या जमिनी जात असताना तेथील गावपण कसे टिकवून ठेवता येईल आणि त्यांना सोयीसुविधा कशा पुरवता येतील जेणेकरून तेथील ग्रामस्थ नाराज होणार नाहीत, याबाबत आ. राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांशी एमएमआरडीएच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली.
दरम्यान, शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत एमएमआरडीएकडून सकारात्मकता दर्शविण्यात आल्याने मेट्रो दृष्टिक्षेपात आल्याचा विश्वास आ. मोरे यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण, डोंबिवली ते नवी मुंबई वाहतूक सुकर व्हावी यासाठी खा. डॉं. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण तळोजा मेट्रो 12 प्रस्तावित करण्यात आली असून या मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. खा. डॉं. शिंदे यांच्याकडून मेट्रो मार्गांच्या कामाचा वारंवार आढावा घेतला जात असला तरीही कल्याण ग्रामीणचे आ. राजेश मोरे देखील सातत्याने या कामाबरोबरच कल्याण ग्रामीणच्या नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नये यासाठी पाठपुरावा करीत आहेत. कल्याण तळोजा मेट्रोचा मार्ग कल्याण ग्रामीण रोटरी क्लब खोपोलीतर्फे 'अभिजात मराठी'चा गौरव जात असून बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आ. राजेश मोरे सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
आ. मोरे यांनी उपाध्यक्ष अविनाश मुदगल, अतिरिक्त आयुक्त पद्माकर रोकडे, प्रकल्प अधिकारी बसवराज यांच्याशी चर्चा करीत या कामात काही अडचणी आहेत का ? याची माहिती घेतानाच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला वेळेत देण्याच्या सूचना केल्या. तसेच हे काम कमीत कमी कालावधीत पूर्ण करून लोकांना मेट्रो सफरीचा मार्ग खुला करून देण्याची मागणी ही त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण आणि आ. राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक सतीश मोडक आदी उपस्थित होते.