धाकटी पंढरी विठ्ठल मंदिर ताकई येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 99 वर्ष सोहळा संपन्न

खालापूर / प्रतिनिधी :- धाकटी पंढरी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 375 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा ताकई विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. ताकई मंदिरातील हा 99 वर्ष सोहळा आहे. या सोहळ्याचा प्रारंभ 9 मार्च 2025 रोजी आ. महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. 18 मार्च 2025 रोजी या सोहळ्याचा समारोप करण्यात आला, हा दहा दिवसांचा  सोहळा विठ्ठल मंदिर ताकई देवस्थान कमिटीने आयोजित केला होता.

यावेळी रोज पहाटे 4.30 ते 6.30  वाजता काकडाचे आयोजन होते. सकाळी 9 ते दुपारी 12.30 वेदप्रणित गाथा, 4 ते 6 कीर्तन सेवा, सायंकाळी 6.30 ते 7.30 हरिपाठ, रात्री 9 ते 11 वाजता विविध महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते. 18 मार्च रोजी काल्याचे कीर्तन सेवा डॉं. विवेकानंद महाराज मिसाळ यांची होती. अतिशय सुंदर कीर्तन झाले. सर्व उपस्थित वारकरी संप्रदायातील दिग्गज व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होत्या. काल्याच्या कीर्तनाला 2500 वारकरी उपस्थित होते. विठ्ठल मंदिर कमिटीचे अध्यक्ष अनंत पाटील व सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. सर्व पंचक्रोशीतील नागरिकांचा या कार्यक्रमात समावेश होता. बऱ्याच जणांनी अन्नदान केले. मंडप व साउंड सिस्टमची व्यवस्था उत्तम होती. कमिटीचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी पुढील वर्षी 100 वा तुकाराम बीज कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे या पेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post