महाराष्ट्रात दुसरी अयोध्या होण्याची शक्यता !

* वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲंड. प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया

मुंबई / प्रतिनिधी :- 14 फेब्रुवारीला 'छावा' नावाचा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मुगल सम्राट औरंगजेब आणि त्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद येथील त्याची कबर हे मुद्दे चांगलेच चर्चेत आले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असे म्हटलं होते, त्यानंतर वाद निर्माण झाला आहे. बजरंग दल व विश्व हिंदू परिषद (विएचपी) यानंतर औरंगजेबाची कबर उखडून टाकली जावी, अशी मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून नागपूर येथे हिंसाचाराच्या घटना घडली आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲंड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्याच्या बाहेरचे लोक औरंगजेबाची कबर हा राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ॲंड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नागपूर हिंसाचारानंतर दोन्ही बाजूच्या लोकांवर तसेच खोटी अफवा परविणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारवाई व्हायची असेल तर दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही. तिला दोन हात लागतात. अप्रिय गोष्ट जरी असली तरी मुख्यमंत्र्‍यांनी ती करावी जेणेकरून महाराष्ट्र हा 1992 साली जे यूपीमध्ये झाले होते, ते येथे होवू नये. ऐवढी खबरदारी मुख्यमंत्री यांनी घ्यावी, अन्यथा औरंगजेबाची मजार हे राज्याच्या बाहेरची लोक एक राष्ट्रीय मुद्दा करू पाहत आहेत. अयोध्याचा आता राजकीय फायदा नाही आहे, औरंगजेबाची मजार यामध्ये राजकीय लाभ आहे, त्यामुळे ही दुसरी अयोध्या होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणे हा त्याच्यातील कारभार राहणार, असे ही ॲंड. आंबेडकर म्हणाले.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने महाल, गांधी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर औरंगजेबचा प्रतिकात्मत पुतळा सोमवारी जाळला होता. त्यानंतर सांयकाळी दोन गटांत वाद निर्माण झाला होता आणि यानंतर परिसरात दंगल उसळली. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. हिंसाचारावेळी पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झाले. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले होते. डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला. याप्रकरणी विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post