झोपेतच एका पाठोपाठ तीन हृदयविकाराचे 3 झटके

* 28 वर्षीय तरूणीचा हार्ट अटॅकने मृत्यू 

नाशिक / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील लासलगावच्या टाकळी विंचूरमध्ये राहणाऱ्या कल्याण मोकाटेचा झोपेतच मृत्यू झाला. कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठलीच नाही. घरच्या मंडळींनी तिला झोपेतून उठविण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिने कोणताच प्रतिसाद दिला नाही. कल्याणी कोणतीच हालचाल करीत नव्हती. त्यामुळे कुटुंबियांना चिंता वाटू लागली, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

कुटुबियांनी कल्याणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉंक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबियांसह शेजाऱ्यांना धक्काच बसला. शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) करण्यात आले, त्यातून तिच्या मृत्यूचा धक्कादायक खुलासा झाला. कल्याणी मोकाटे झोपेत असताना तिला एका पाठोपाठ एक असे हृदयविकाराचे 3 झटके आले आणि त्यातच तिची प्राणज्योत मालवली. कल्याणीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कल्याणीच्या घरात कोणालाच हृदयविकाराचा त्रास नाही. पण तरीही कल्याणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post