पत्रकार सुधीर माने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

* महालक्ष्मी आधार फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

सातारा / प्रतिनिधी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष व साप्ताहीक खालापूर वार्ताचे सुधीर गोविंद माने यांना नुकतेच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साताराचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. पुरस्कार मानकरी यांना सन्मानपत्र ट्रॉंफी व फुलगुच्छ भेट देऊन त्यांना गौरव व सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा सातारा राजवाडा  पाठक हॉंल येथे महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रतिभा शेलार यांनी आयोजन केले होते.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये निवडक उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट एडवोकेट, उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते, उत्कृष्ट समाजसेविका, उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी, उत्कृष्ट पोलिस अधिकारी, उत्कृष्ट गायक, व्याख्याता व शिवगर्जना शिवरायांची शौर्यगाथा तसेच संविधानिक कार्य करणारी व्यक्तिमत्व असणारे सर्व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० व्यक्तींचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला, अशी माहिती महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रतिभा सुनील शेलार यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, संस्थेच्या संस्थापिका प्रतिभा शेलार, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र आबा जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थिंनी आलिया बागवान हिने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना व शौर्यगाथा सादर केली, त्यानंतर विद्यार्थी अबूबकर बागवान यांनी भारतीय संविधानाचे मूलभूत हक्क व कर्तव्य याचे सादरीकरण केले. ईश्वरी भोकरे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला, त्यानंतर एडवोकेट शिवाजी यशवंतराव देसाई यांचे भारतीय संविधानावर व्याख्यान सादर करण्यात आले.     

यानंतर सर्वश्री वैद्यकीय सेवा अमर जाधव, उद्योजिका सुवर्णा कचरे, पत्रकार नासिर बागवान, पत्रकार शंकर माने, पत्रकार समीर निकम, प्राणीमित्र शोभा भोसले, समाजसेवक पांडुरंग माने, शिक्षक संभाजी मदने, शिक्षक जगन्नाथ लोहार, समाजसेवक राहुल चव्हाण, संचालिका शशिकला घाडगे, समाजसेवक किरण खरात, समाजसेविका शितल मिसाळ, संगीतकार सुरेश दयाळ, समाजसेवक अक्षय चव्हाण, पत्रकार सुधीर गोविंद माने, पत्रकार पंडित अभिजीत कुलकर्णी, रेस्क्यू टीम दिपक जाधव, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र आबा जाधव, लिलाबाई जाधव, चित्रकार मोहन जगताप, पत्रकार सुशील गायकवाड, पत्रकार पद्मा गिऱ्हे ,वैद्यकीय सेवा अर्चना सावंत, सांस्कृतिक कला ईश्वरी भोकरे, सांस्कृतिक कला आलिया बागवान, पत्रकार शर्मिला बाबर, डॉं. सुप्रिया नाईक, पोलिस सरोजनी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विकास तोडकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर आढाव, अनिस कार्यकर्ते प्रशांत पोतदार, ॲंड. अशोक रामटेके, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चांदणे, प्रशिक्षक प्रकाश कांबळे काशीळकर, डॉं. सचिन सादरे, अँड. शिवाजी देसाई, समाजसेविका मेहरुनिया मुलांनी, अनाथ आश्रम संचालिका सिस्टर ब्लेसी, अँड. आलिम पटेल, शिक्षिका वंदना शिंदे, अभिनेत्री कुमुदिनी अदाटे, संचालिका मंगल भिंगारे, सेवानिवृत्त कलाध्यापक भागोजी शिखरे, समाजसेविका नूरजहा खाटीक, ॲंड. जहुर इनामदार, ज्येष्ठ पत्रकार अनिल वीर, युवा समाजसेवक ऋषिकेश गायकवाड, गायिका अभिनेत्री धनश्री बागडे, समाजसेविका सुवर्णा पाटील, नगर वाचनालय साताराच्या ग्रंथपाल रूपाली मुळे, शालेय विद्यार्थी अब्बूबकर बागवान, स्त्री सशक्तिकरण विजया साखरे  आदींचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव व सन्मान  करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post