* नागरिकांकडून झोनल मॅंनेजरच्या निलंबनाची मागणी
ठाणे / प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवा (एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस) अंतर्गत डॉंक्टरांची अत्यंत कमी संख्या आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक स्थानिकांमध्ये विशेषत : कल्याण, भाईंदर, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ आणि पावणे आदी ठिकाणी डॉंक्टरांची कमतरता दिसून येत आहे. या सर्व ठिकाणी डॉंक्टर्स ड्युटीवर नसल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. काही ठिकाणी 24 तास एकाच डॉंक्टरला ड्युटीवर ठेवण्यात येत असते.
याला सर्वस्वी कॉंर्डिनेट जबाबदार असलेल्या ठाणे जिल्हा झोनल मॅंनेजर मोरे यांच्या अपारदर्शक व्यवस्थापनामुळे रुग्णसेवेमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. खासकरून, 23 जानेवारी 2025 रोजी सेंटर हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स वेळेवर न पोहोचल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यामुळे रुग्णसेवा अतिशय ढासळली असून नागरिकांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. तथापि, या समस्येवर झोनल मॅनेजर मोरे यांनी कोणतीही कार्रवाई केली नाही, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
मोरे यांच्या व्यवस्थापनाखाली अनेक ठिकाणी डॉंक्टर्स आणि रुग्णवाहिकांचा अभाव दिसून आला आहे. कायमच्या डॉंक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळू शकत नसल्याचे दिसून येत आहे. तरी नागरिकांच्या वतीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे आणि तात्काळ झोनल मॅंनेजर मोरे यांना निलंबित करावे, अशी मागणी केली जात आहे. जर कारवाई केली गेली नाही, तर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील नागरिक आणि रुग्णसेवकांनी मागणी केली आहे की, झोनल मॅंनेजर मोरे यांचे तात्काळ निलंबन केले जावे. तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी, ज्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याची खात्री होईल.
