* लाखों रूपये किंमतीची कचरा उचलणाऱ्या घंटागाडीची राखरांगोळी
खालापुर / सुधीर देशमुख :- खालापुर तालुक्यातील उत्कुष्ट पुरस्कार प्राप्त नारंगी गृप ग्रामपंचायत कार्यालयामधील लाखों रुपये किंमतीची कचरा उचलणारी घंटा गाडीची राखरांगोळी झाली आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीच्या सुमारास नारंगीच्या गावात उघड्यावर गाडी उभी केली होती. एका अज्ञात इसमाने रात्रीच्या अंधारात त्या गाडीची पुढची केबिन आगीत भस्मसात केली.
काही वर्षापूर्वी उत्तम स्टील कंपनीने फंडातून नारंगी ग्राम पंचायतीला लाखों रुपये किंमतीची कचरा उचलणारी गाडी लोकांच्या सेवेसाठी दान केली होती. दान स्वरूपात फुकट मिळालेल्या लाखों रुपयाची गाडी जतन करता आली नाही. जर लाखों रुपये खर्च करुन ही गाडी खरेदी केली असती तर त्याची किंमत कळली असती. अशी उघड्यावर शासकीय गाडी पार्कींग करुन ग्रामपंचायत कर्मचारी काम करतात, अशा कर्मचारी वर्गांला पाठीशी घालणारे प्रशासनातले ग्रामपंचायत अधिकारी हे जबाबदार आहेत. मोठे कंपाउंड, मोठे गेट, सीसीटीवीची व्यवस्था असतांना सुध्दा गाडी ग्रामपंचायत कंपाउंडमध्ये पार्कींग केली गेली नाही. ती घंटागाडी नारंगी गावात एका अंधारात बेवारस अवस्थेत उभी केली गेली व कोणीतरी त्याची होळी करुन राखरांगोळी केली. या सर्व प्रकरणाला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची संतप्त भावना नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
