खोपोली / प्रतिनिधी :- श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती १२ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांनी मनोभावे पूजन करून अतिशय आनंदी वातावरणात हा कार्यक्रम यशस्वी केला.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, दिलीप पुरी, कैलास गायकवाड, रवि रोकडे, जिनी सॅम्युअल, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन संतोष कंगले यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारुती सुर्यवंशी, अनिल नागोटकर, अनिल खालापूरकर, संतोष शेलार, किशोर चव्हाण, निलेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
