भावविश्व उलगडता आले पाहिजे - प्राचार्य डॉं. माहेश्वरी गावित

अहिल्यानगर / प्रतिनिधी :- मनातील भाव संवेदना व्यक्त करण्यासाठी कविता हे महत्त्वाचे साधन असून शब्दगंधच्या माध्यमातून नवोदितांना लिहिण्याची प्रेरणा मिळत आहे. अनुभवावर आधारित काव्य लेखन समाजावर प्रभाव पाडू शकते, कवीला कमीत कमी शब्दांत आपले भावविश्व उलगडता आले पाहिजे, असे मत प्रेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉं. माहेश्वरी गावित यांनी व्यक्त केले.      

शब्दगंध साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या  काव्य संमेलनात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी विचारपिठावर कोपरगावच्या माजी नगराध्यक्ष ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, कवी शशिकांत शिंदे, हनुमंत माने, रोहिदास पोटे, प्रकाश खंडागळे, सुनील कोंडके, भास्कर निर्मळ, कवयित्री शर्मिला गोसावी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉं. गावित म्हणाल्या की, शब्दगंधने सुरू केलेले हे विचाराचे व्यासपीठ सक्षम बनलेले असून राज्यभरातील कवी या सत्रासाठी उपस्थित असल्याचे पाहून आनंद वाटतो. वेगवेगळ्या बोली भाषेतील काव्यरचना सादर करून रसिकांची मनोभावे साहित्य सेवा या नवोदितांकडून होत आहे, त्यामुळे आनंद वाटतो.     

सुभाष सोनवणे, संगीता फसाटे व बबनराव गिरी यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्य संमेलनामध्ये सुनील जाधव, आनंदा साळवे, बाळासाहेब कोठुळे, सुनील कोंडके, गौतम ढोके, लक्ष्मण वाल्हे, जयश्री पवार, स्वाती पुरी, वंदना चिकटे, क्रांती करंजगीकर, अशोक शिंदे, जयश्री मंडलिक, शितल डफळ, राजेंद्र उदारे, बाळासाहेब गुंतवणे, मारुती खडके, सुमेध ब्राह्मणे, रियाज मगदूम, सुनीलकुमार सरनाईक, देविदास अंगरख, शैलजा रोहम, ज्योती गोसावी, सुरेखा घोलप, जयश्री झरेकर यांच्यासह १२० कवींनी काव्यसंमेलनात सहभाग घेतला.     

यावेळी संमेलनाध्यक्षा डॉं. संजीवनी तडेगावकर, स्वागताध्यक्ष संपत दादा बारस्कर, दुरेकर सायन्स अकॅडमीचे संचालक व खानदेश वार्ताचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी, प्रा. डॉं. गणी पटेल, पांडव पुरी, संतोष ब्राह्मणे, हर्षल आगळे, सचिन हुसळे, गणेश आर्ट्सचे गणेश दळवी, प्राचार्य जी. पी. ढाकणे, हरिभाऊ नजन  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post